उत्तर प्रदेश : मुळे, पाने किंवा माती असलेला ऊस कोणत्याही खरेदी केंद्रावर न स्वीकारण्याचा उपायुक्तांचा निर्णय

मुरादाबाद : राज्यातील कोणत्याही खरेदी केद्रावर शेतकऱ्यांकडून ऊस विभागाला फक्त स्वच्छ आणि हिरवा ऊस पुरवला जाईल. शेतकऱ्यांकडून मुळे, पाने किंवा माती असलेला ऊस कोणत्याही खरेदी केंद्रावर स्वीकारला जाणार नाही. त्यांनी फक्त स्वच्छ, कच्चा आणि प्रमाणित दर्जाचा ऊस साखर कारखान्यांना पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे ऊस विभागाचे उपायुक्त हरपाल सिंह यांनी स्पष्ट केले. कारखान्यांच्या यार्डमध्ये स्वच्छता आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाईल. घाणेरडा, मुळांचा आणि पानांचा ऊस वजनासाठी स्वीकारला जाणार नाही. उसातील रसाचे वजन कमी होऊ नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारखान्यांच्या यार्डमध्ये पडलेला ऊस ताबडतोब कारखान्यांमध्ये पोहोचवण्याचे आदेश वजन करणाऱ्या लिपिकांना देण्यात आले आहेत.

ऊस उपायुक्त हरपाल सिंह यांनी, अमरोहा आणि चंदनपूर साखर कारखान्याच्या नजरपूर खरेदी केंद्राची आणि चंदनपूर साखर कारखान्याची अचानक तपासणी केली. त्यांनी वजन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या स्लिप सिस्टमची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी बिजनौर जिल्ह्यातील जगुआ खुर्द केंद्राची पाहणी केली. शेतकरी गुरमीत सिंग यांचा मुलगा कृपाल सिंग यांच्या उसाचे वजन केल्यानंतर, रिकाम्या ट्रॉलीचे वजन २७.१५ क्विंटल झाले. हे वजन योग्य असल्याचे आढळून आले. या दौऱ्यात त्यांनी दादूपूर, हाफिजपूर आणि रहमापूर खालसा खरेदी केंद्रांची पाहणी केली. येथे वजन केल्यानंतर अनेक ट्रॉल्यांतील ऊस तसाच पडून असल्याचे आढळून आले. हा ऊस तातडीने कारखान्यांमध्ये पाठविण्याची सूचना करण्यात आली. ऊस स्वच्छ असावा अशा कडक सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here