सोलापूर : लोकशक्ती शुगरच्या वतीने सीना व भीमा या दोन्ही नद्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसपट्ट्याला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन लोकशक्ती शुगरचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी केले. औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकशक्ती शुगरचा पहिला बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक विवेक पवार व त्यांच्या पत्नी सारिका पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खोराटे बोलत होते.
कोल्हापूरच्या अथर्व समूहाच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांच्या अथक प्रयत्नामुळे यंदाच्या वर्षी कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाळप वेळेत करण्यासाठी कारखान्याच्या वतीने भूमिका निश्चित केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्हाईस प्रेसिडेंट के. एस. चौगुले, डॉ. अमोल पाटील, सर्जेराव चवरे, पंडित निकम, मानाजी माने, प्रकाश आवताडे, चीफ इंजिनिअर सिद्धेश्वर शिंदे, चीफ केमिस्ट नागेश पवार, मुख्य शेतकरी राजाराम पवार, उपशेतकी अधिकारी निंगफोडे, इलेक्ट्रिक मॅनेजर अखिल बीटे, सिव्हिल इंजिनिअर संजीव करजगी, केमिस्ट जगदीश करजगी, असिस्टंट इंजिनिअर सातप्पा दोड्याळ, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर गजानन उमराणी, बाबासाहेब गणाचारी, राजेश माळी, अमोल तिर्थे, बाळासाहेब गायकवाड, शामा भोईटे, शंकर फुलसागर, सचिन मलगे, चंद्रकांत रगोड, इम्रान इनामदार, गुरुराज कुलकर्णी, श्रीकृष्ण सुतार व शेतकरीबांधव उपस्थित होते. के. एस. चौगुले यांनी आभार मानले.
एका तपानंतर लोकशक्ती शुगर गाळपासाठी सज्ज…
लोकशक्ती शुगर नव्याने उभारलेला साखर कारखाना एका तपानंतर पहिल्यांदाच गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे. कारखान्याचा ‘प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन’ सोहळा शनिवारी (ता. १५) उत्साहात पार पडला. कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे आणि संचालक पृथ्वीराज खोराटे यांच्या नेतृत्वाखाली हा साखर प्रकल्प साकारला आहे. शेतकरी हितासाठी वेळेत गाळप सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तांत्रिक व प्रशासकीय कामे युद्धपातळीवर पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थिरता व न्याय मिळावा हा लोकशक्ती शुगरचा हेतू आहे. लवकरच गाळप हंगामाचे औपचारिक उद्घाटन करून कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल.















