कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्याकडे यंदाच्या गळीत हंगामासाठी २०२५-२६ गाळपास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रिक टन ३ हजार ४०० रुपये विनाकपात ऊसदर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी पत्रकातून दिली. आजरा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू असलेला कारखाना असून, पंधरा दिवसांत पन्नास हजार मे. टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा असून, आजरा तालुक्यासह गडहिंग्लज, चंदगड इत्यादी भागांतून नियमित ऊस पुरवठा सुरू आहे.
गाळपासाठी येणाऱ्या उसाची बिले नियमित व वेळेवर देण्याचे आर्थिक नियोजन संचालक मंडळाने ‘केडीसीसी’च्या सहकायनि केले आहे. असे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी सांगितले. उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, उदयराज पवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनीषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी पाटील, अशोक तर्डेकर, हरिभाऊ कांबळे, कार्यकारी संचालक एस. के. सावंत उपस्थित होते.


















