बीड : सोनाई ॲग्रो कारखान्याचा आजपासून पहिला गळीत हंगाम सुरू

बीड : सोनाई ॲग्रो अँड फूड प्रॉडक्ट्स गूळ पावडर कारखान्याच्या पहिल्या गळीत चाचणी हंगामाचा बुधवारी प्रारंभ होणार आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील माळहिवरा येथे उभारण्यात आलेला या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाला माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवतराव कराड, महादेव महाराज चाकरवाडीकर, विठ्ठल महाराज शास्त्री, अर्जुन महाराज लाड, तुकाराम महाराज शास्त्री, भरत महाराज जोगी यांच्या हस्ते सुरुवात होईल. या कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोनाई अॅग्रोचे संस्थापक अध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे, उपाध्यक्ष आत्माराम कराड, कारखान्याचे संचालक प्रा. विजय मुंडे, प्रदीप मुंडे व राहुल कराड यांनी केले आहे.

सोनाई अॅग्रो अँड फूड प्रॉडक्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे, भरत गीते, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमुख्य व्यवस्थापक दिगंबर महाडीक, मुख्य प्रबंधक रविरंजन यांच्यासह नाथराव कराड, नितीन चेचानी, चंद्रकांत गीते, धनंजय देशमुख, रामराव गीते, शिवाजीराव मिसाळ, सुनील सारडा, महेश बँकेचे अध्यक्ष ओमप्रकाश सारडा, के. एम. उपाध्याय, नितीन राऊत आदींची उपस्थिती राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here