पुणे : ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजतर्फे कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के पगारवाढ जाहीर

पुणे : ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजतर्फे एक महत्त्वपूर्ण व कर्मचारीहिताचा निर्णय घेण्यात आला आहे. समूहातील सर्व कर्मचाऱ्यांना २० टक्के पगारवाढ लागू करण्यात येत असल्याची घोषणा ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केली. ते म्हणाले, या निर्णयाचा लाभ ग्रुपमधील सर्व कर्मचाऱ्याना मिळणार आहे.

चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले कि, कर्मचारी हीच आमच्या समूहाची खरी ताकद आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच ओंकार ग्रुपने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. ही वेतनवाढ कर्मचारीवर्गाप्रती त्यांच्या परिश्रमाचे व त्यागाचे मोल आहे.

ते म्हणाले, समूहात सध्या १६,५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. समूहाच्या सर्व युनिटमध्ये वेळेवर वेतन, शेतकरी हिताचे उपक्रम, समाजकल्याण कार्यक्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांसाठी ओंकार ग्रुप ओळखला जातो. २० टक्के पगारवाढ लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात अधिक वाढ होणार असून आगामी गाळप हंगामासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पगारवाढीने ओंकार साखर कारखान्याचे कर्मचारी आनंदीत

निमगाव : ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे- पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे- पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रसह कर्नाटकात साखर कारखानदारीत धाडसाने मोठे पाऊल टाकले. आज ते यशस्वी झाले. १७ युनिटच्या माध्यमातून २० हजार कर्मचाऱ्यांच्या व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो हाताला काम दिले. अनेकांचे कोलमडलेले संसार उभे करण्याचे काम बोत्रे-पाटील यांनी केले. २० टक्के पगारवाढ केल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

समूहाच्या युनिट एकमध्ये ऊस गाळपाचे विना अडथळा १ लाख टप्पा पूर्ण केल्याने कर्मचारी वर्गांनी खाऊ वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी केन मॅनेजर शरद देवकर, इलेक्ट्रिक विभाग प्रमुख प्रमुख धनाजीराव पवार, मेजर मोहन घोडके, रमेश औताडे, मोहन सरगर, प्रशांत कस्तुरे, धर्मा बोडरे यांच्यासह कर्मचारीवर्ग व वाहन मालक उपस्थित होते. यावेळी बाबूराव बोत्रे-पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने बोत्रे-पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. ओंकार परिवारासाठी माझा शेतकरी व कर्मचारीवर्ग आत्मा आहेत. माझ्या पाठीशी ते सर्वजण खंबीरपणे उभे राहिल्यानेच परिवाराची भरारी सुरू असल्याचे बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here