अहिल्यानगर : ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज युनिट सात येथे ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ उत्साहात पार पडला. ओंकार शुगर समूहाचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील, सपत्नीक रेखा बोत्रे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन करण्यात आले. यावेळी बॉयलर व गव्हाण पूजन अतुल जाधव-शीतल जाधव व दत्तात्रय तावरे – पूनम तावरे यांच्या हस्ते पार पडले. गव्हाण पूजन गोविंद कातोरे, काशिनाथ कौठाळे, सोमनाथ खेडकर, आनंद खेडकर, भास्कर कदम आदींच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाला संचालक प्रशांत बोत्रे-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पांढरकर, ॲड. निवृत्ती वाखारे, बोत्रे पाटील म्हणाले, स्व. सदाशिव अण्णा पाचपुते यांनी कारखानदारीतील आमच्या चुका तुम्ही सुधारून दाखवा, असा मला दिलेला कानमंत्र आजही मार्गदर्शक आहे. देवदैठण युनिटची क्षमता १२०० मेट्रिक टनांवरून आता ३५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















