कोल्हापूर : कुंभी-कासारी कारखान्यामध्ये गुरुवारी हंगाम २०२५-२६ मधील पहिल्या साखर पोत्याचे पूजन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्यातली गाळप विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या हंगामाची सुरुवात ६,५०० मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळपाने केली जाणार आहे. सर्वच विभागांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होत आहे, अशी माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
गळीत हंगामाविषयी माहिती देताना आ. नरके म्हणाले की, कारखान्याचे गाळप विस्तारीकरण ८ हजार मेट्रिक टन केले आहे. पण, बॉयलिंग हाऊस व उत्पादन विभागाची काही तांत्रिक कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण होतील. साखर पोती पूजन प्रसंगी संचालक ॲड. बाजीराव शेलार, संजय पाटील, विश्वास पाटील, विलास पाटील, दादासो लाड, सर्जेराव हुजरे, किशोर पाटील, अनिष पाटील, राऊ पाटील, प्रकाश पाटील, पी. डी. पाटील, उत्तम वरुटे, बळवंत करचे, प्रमिला पाटील, धनश्री पाटील, प्रा. बी. बी. पाटील, रवी मडके, कामगार प्रतिनिधी नामदेव पाटील, दीपक चौगले, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील उपस्थित होते.


















