पुणे : प्रती टन ५० रुपये ‘खुशाली’, चालक भत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट !

पुणे : इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी पाठवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी वाढत आहे. ऊस वेळेत गाळपाला जावा यासाठी आता प्रति टन ५० रुपये दराने तोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ आली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा ट्रकचालकांना दररोज भत्ता म्हणून हजारो रुपये द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. उजनी पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीची घाई आहे. मात्र याच शेतकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक वाढली आहे.

शेतकऱ्यांवर ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाचे प्रचंड ओझे वाढले आहे. ऊस तोडणीसाठी प्रति टन ५० रुपये घेण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू असून, शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा मोठा भुर्दंड बसत आहे. तोडणी कामगार अथवा मुकादमाकडून पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांचा खोडवा ऊस प्रथम गाळपाला घेतला जातो. लागण असलेला, परिपक्व ऊस शेतातच उभा राहतो, असेही चित्र दिसून येत आहे. ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदार मालक यांची मनमानी वाढत आहे. शेतकऱ्याला आता कोणीही वाली उरलेले नाही, अशी खंत ऊस उत्पादक शेतकरी खुलेपणाने व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here