कोल्हापूर : ‘दौलत-अथर्व’कडून ३४०० रुपये पहिली उचल जाहीर, उर्वरित १०० रुपये हंगामानंतर मिळणार

कोल्हापूर : गडहिंग्लज, आजरा, चंदगड विभागातील कारखान्यांकडून कुंभार, गोपाळ गावडे, बाळाराम ३६०० रुपये प्रतिटन दर मिळावा, या मागणीसाठी आठ दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजगोळी (ता. चंदगड) येथील ओलम कारखान्यावर आंदोलन केले होते. त्यावेळी ओलम प्रशासनाने पहिली उचल ३४०० रुपये आणि हंगाम संपल्यानंतर १०० रुपये देण्याचे कबूल केल्यावर आंदोलन मागे घेतले. याच धर्तीवर हलकर्णी येथील दौलत – अथर्व कारखान्यानेही यावर्षीच्या उसाला ३५०० रुपये दर देण्याचे मान्य केले आहे. पहिली उचल ३४०० आणि हंगाम संपल्यानंतर १०० रुपये देण्यास प्रशासनाने लेखी दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांना भेटून निवेदन दिले होते. ‘ओलम’च्या धर्तीवर ‘दौलत- अथर्व’नेही दर द्यावा, या मागणीसाठी संघटनेचे प्रा. पाटील, तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी, विश्वनाथ पाटील, गजानन राजगोळकर, विरुपाक्ष फडके, मारुती अर्जुनवाडकर, सातू मामगावडे, गोपाळ नागुर्डेकर, राजेंद्र पाटील, जोतिबा पवार, राम बसरीकट्टी, हणमंत सावंत आदींनी प्रयत्न केले. कारखान्याने ३६०० रुपये दर द्यावा, अशी मागणी केली. यावेळी मराठे यांनी संघटनेच्या मागील देण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here