सोलापूर : भैरवनाथ शुगरच्या वजनकाट्याची भरारी पथकाकडून अचानक तपासणी, काटा अचूक

सोलापूर : लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.च्या वजनकाट्याची पुणे जिल्हा शाखेचे उपनियंत्रक टी. के. पाटील, वाघोली विभाग वैधमापन शास्त्र निरीक्षक सतीश अभंगे यांच्या वजनकाटा तपासणी भरारी पथकाने केली. पथकाने अचानक भेट देऊन वजन काट्याच्या कार्यप्रणालीची सखोल तपासणी केली. यावेळी कारखान्याकडून शासनाने नियमित कार्य पद्धतीचे तंतोतंत पालन केले जात असून, वजनकाटा चोख असल्याचे दिसून आले. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार व वाहन चालक उपस्थित होते.

भरारी पथकाने अचानक कारखान्यातील ऊस वजनकाट्याची तपासणी केली. उसाने भरलेल्या वाहनांची कसून तपासणी केली. वजनकाटे प्रमाणित असल्याची खातरजमा केली. यावेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला असल्याची माहिती चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित सदैव डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालविला जातो. चेअरमन अनिल सावंत म्हणाले की, पुन्हा एकदा भैरवनाथ साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यावेळी जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, शिवाजी चव्हाण, कृष्णदेव लोंढे, संजय राठोड, दयानंद पासले, शंकर पाटील, गजानन माने-देशमुख, केदार साबणे तसेच कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here