लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना व गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना परिसरातील कामगार, ऊसतोड करणारे मशीन ऑपरेटर व ऊस वाहतूक करणाऱ्या चालक व मजुरांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. १५० मजूर कामगारांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवठा करणारे हार्वेस्टर ऑपरेटर, चालक, मजूर तसेच कारखान्यात काम करणारे कामगार यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने व गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य शिबिर घेतले.
आरोग्य शिबिरामध्ये रक्त, युरिन, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराच्या यशस्वितेसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक, खाते प्रमुख, कारखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, गंगापूर आरोग्य केंद्राचे डॉ. महेश दीक्षित, डॉ. शुभांगी बराटे, डॉ. कल्पेश लांडे, आरोग्य सेवक गीता गुले, डी. जे. शिंदे, लक्ष्मी फटकरे व मुजमिल शेख यांनी सहकार्य केले. या शिबिराचा १५० मजूर कामगारांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.
















