पुणे : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर साखरशाळा

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यात आली आहे. उसाच्या फडात जी मुले आई-वडिलांच्या पाठीमागे फिरताना दिसत होती. ती आज वही पेन घेऊन या साखर शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या सूचनेनुसार ऊस तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आली आहे.

या साखर शाळेला कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ व अधिकाऱ्यांनी भेट देवून शाळेतील मुलांशी संवाद साधला. येथील ऊस तोडणी मजुरांचा एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, याची दक्षता निर्माण कारखाना घेत असल्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here