धाराशिव :’एनव्हीपी’कडून ऊसबिल जमा – चेअरमन बालाजी पाटील

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगरच्या वतीने २०२५- २०२६ च्या द्वितीय गळीत हंगामात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल मंगळवारी (ता.१६) संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बालाजी पाटील यांनी दिली आहे.एनव्हीपी शुगरकडून चौथा पंधरवडा पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊसबील जमा करण्यात आले. विशेष म्हणजे तिसऱ्या पंधरवड्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कारखान्यात उत्पादित झालेल्या एक लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजनही कारखान्याच्या करण्यात आले.

चेअरमन बालाजी पाटील म्हणाले, यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून चाचणी गळीत हंगामाप्रमाणेच यंदाच्या गळीत हंगामातही पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना ऊसबील देण्याची परंपरा कायम जोपासली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिलेले आहे, त्यांनी बँकेत जावून आपले बिल घ्यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते दिलेले नाही, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि. धाराशिव बँकेत उसाचे बिल घेऊन जावे, असे पाटील यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here