सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर्स कारखान्याच्या पाच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या विस्तारीकरण प्रकल्पाचा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. प्रारंभी कारखाना कार्यस्थळावरील दिवंगत संपतराव माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बॉयलर विभागातील कर्मचारी हणमंत मोहिते यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन व विधिवत पूजा झाली. दिवंगत डॉ. पतंगराव कदम व दिवंगत भारती लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जातून मिळणाऱ्या व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे मत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश लाड, उद्योजक रोहन लाड, राजेंद्र लाड, बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, शिल्पा कुलकर्णी, सतीश सावंत, शेखर साळुंखे, विठ्ठल साळुंखे, विजय पाटील, दिलीप लाड, सतीश पाटील, मंगेश येसुगडे यांच्या हस्ते अग्नीप्रदीपन करण्यात आले. आर. डी. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दिलीप लाड, अरुण दिवटे, महेश जोशी, प्रसाद गोकावे, संतोष जगताप, सुरेश खारगे, बी. आर. पवार, मोहन लाड, ओंकार लाड यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

















