सांगली : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी

सांगली : य. मो. कृष्णा सहकारी कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र येडेमच्छिद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार व माता-बालक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये १८३ जणांची आरोग्य तपासणी व त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्याहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी ऊसतोड मजुरांसाठी अनेक उपक्रम नेहमीच राबवित असतात. सर्वांनी आरोग्य जपले पाहिजे, आपले आरोग्य म्हणजे आपली दौलत आहे प्रथमतः आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. काम करत असताना आपल्या शरीराची काळजी घेऊन काम केले पाहिजे, असे आवाहन सुतार यांनी केले.

किल्ले मच्छिद्रगडच्या सरपंच वैशाली साळुंखे, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सिव्हिल इंजिनिअर जयवंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीरास डॉ. प्रकाश वाठारकर, डॉ. गायत्री जगताप, डॉ. ईश्वर दाभाडे, कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल निकम यांच्यासह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here