सातारा : खटाव- माण अग्रो प्रोसेसिंग कारखाना कार्यस्थळावरील आरोग्य शिबिरास प्रतिसाद

सातारा : पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण अग्रो प्रोसेसिंग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी कामगारांसाठी सर्वरोग निदान शिबिर नुकतेच झाले. या शिबिरात ३५८ कामगारांची तपासणी करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन व आमदार मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

ऊसतोड कामगारांचे आरोग्य चांगले राहण्याच्या उद्देशाने या शिबिरात मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये ३५८ कामगारांनी सहभाग नोंदवला. गरजू रुग्णांना औषधे मोफत देण्यात आल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली. यावेळी संचालक सनी क्षीरसागर, कारखान्याचे कार्यकारी व्यवस्थापक काकासाहेब महाडिक, शेती अधिकारी किरण पवार, मुख्य लेखापाल अजित मोरे, गोरख कदम, कार्यालय अधीक्षक मल्हारी नाकाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here