सातारा : कोयना-रयत समूहात माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रयत बायोशुगर ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यात अध्यक्षपदी पार्लेच्या तानाजीराव नलावडे, तर उपाध्यक्षपदी कालवडेतील धनंजय थोरात यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे. सहकार क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून उभारलेल्या या संस्थेचे उत्पादन अद्याप सुरू झाले नसले तरी भविष्यात कारखाना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया व नियोजन सुरू असल्याची माहिती दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निवड प्रक्रिया एकमताने झाली. संस्थेच्या पुढील विकासासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू असून, नूतन पदाधिकाऱ्यांचे अॅड. उंडाळकर, आदिराज पाटील उंडाळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. संचालक राजेंद्र पाटील, भाऊसाहेब मंडले, अधिकराव जगताप, अविनाश पाटील, विश्वास कणसे, विश्वनाथ नांगरे, महादेव मोरे, तानाजी जाधव, चंद्रकांत पवार, कृष्णा माने, रामचंद्र पातले, नागेश मोरे, नामदेव रामिष्ठे, अजित पाटील, रेखा कचरे, हेमा पारवे, सचिव शामराव जांभळे आदी उपस्थित होते.

















