सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखाना देणार प्रती टन ३००१ रुपये दर – संचालक धर्मराज काडादी

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या गाळप हंगामासाठी प्रति टन ३ हजार १ रुपया दर निश्चित केला असून, परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा यंदाही कारखान्याने कायम राखली असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले. ऊस दराची रक्कम तीन हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता प्रतिटन २५०० रुपये तत्काळ अदा करण्यात येणार आहे. सरा हप्ता प्रतिटन ३०० रुपये जून महिन्यात दिला जाईल. उर्वरित २०१ रुपयांचा अंतिम हप्ता दिवाळीला अदा करण्यात येणार असल्याचे काडादी यांनी सांगितले.

कारखान्याला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे गाळप केलेल्या ऊस दराची रक्कम एकावेळी अदा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जानेवारीनंतर ऊस गाळपास देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही हप्त्यांच्या देयकांमध्ये विलंब होतो. ही बाब लक्षात घेता, सभासद शेतकऱ्यांना वेळेत व सुरक्षितपणे देयके मिळावीत, या उद्देशाने व्यवस्थापनाने हप्त्यांमध्ये ऊस बिल अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिला हप्ता वेळेत अदा करण्यात येईल, उर्वरित हप्ते पूर्वीप्रमाणे देणार आहोत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन सर्व भागधारक, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठामपणे आश्वस्त करते की, जाहीर केलेले सर्व हप्ते निश्चित कालमर्यादेत अदा करण्यात येतील, असेही धर्मराज काडादी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here