बेळगाव : कर्नाटक राज्यात शेतकऱ्यांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळेच उसाला भाव मिळाला आहे. यापुढेही शेतकरी एकत्र आल्यास भविष्यात मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. पट्टणकुडी येथील महालक्ष्मी मंदिरात रयत बळग संघटनेतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत नाईक, हरित सेनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, शेतकरी संघटनेचे राजू पवार, मल्लाप्पा अंगडी, प्रा. डॉ. अच्युत माने, मनोज मनगुळे, गोपाळ कुकनूर, सुभाष चौगुला उपस्थित होते. यावेळी ऊस दरासाठी आंदोलन केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पट्टणकुडी, वाळकी, सदलगा, भोज व परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
निपाणी भागातील तंबाखू आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. त्यापासून पुढील पिढीला त्यापासून प्रेरणा मिळेल, असे मत शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. शशिकांत नाईक म्हणाले, शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बलिदानातून उभी राहिली आहे. त्यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने येणे गरजेचे आहे, असे सांगितले. तर चुनाप्पा पुजारी म्हणाले की, शेतीसाठी बारा तास वीज, पिकाला योग्य दर मिळण्यासाठी लढा सुरूच राहील. यावेळी जितेंद्र पाटील यांनी स्वागत केले. परसू कुरणे, अरुण भातमारे, खानू गवान्नावर, रवींद्र अक्कोळते, कोमल पाटील, सुदर्शन कागे, राहुल डोणे, जयकुमार कबाडगे, सुकुमार दड्डे, सिकंदर झारी, प्रतीक पळगे, महावीर अक्कोळे, प्रमोद खोत आदी उपस्थित होते.

















