सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याचा ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्काराने गौरव

सोलापूर : पुणे येथील ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५’ ही संस्था विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ या नावाने पुरस्कार देऊन प्रत्येकवर्षी गौरवित असते. यावर्षी श्रीपूरच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुणे येथे पुरस्काराचे वितरण झाले आहे. सहकार आयुक्त दीपक तावरे, चार्टर्ड अकौंटंट मिलिंद काळे व ग्रीन वर्ल्ड को प्राईडचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर एम. आर. कुलकर्णी, आर. एस. पाटील, तानाजी भोसले, एस. वाय. सय्यद, मिसाळ, मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन ग्रीन वर्ल्ड को प्राईड या संस्थेकडून दिला आहे. त्यामुळे कारखान्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या आर्थिक हिताचा विचार करुन, उसाला दिलेला यथोचित व स्पर्धात्मक दर, साखर उत्पादनातील गुणवत्ता, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था आणि कारखाना व्यवस्थापनातील पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या व्यापक विकासासाठी इथेनॉल उत्पादन, को-जनरेशन प्रकल्प (वीज उत्पादन), प्रेसमड व बायो- फर्टिलायझर उत्पादन, डिस्टिलरी, कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प हे यशस्वीपणे चालवून विकासाचे मॉडेल तयार केले आहे, त्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कारखान्यास ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here