सांगली : कर्नाटकातील रायबाग येथील शेतकरी करिसिद्धेश्वर जंगरी यांच्या गुळास येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील गुळाच्या सौद्यात क्विंटलला उच्चांकी ५ हजार ६७८ रुपये दर मिळाला. मार्केट यार्डातील दयानंद विक्रम ट्रेडर्स या अडत दुकानात या शेतकऱ्याच्या गुळाचा सौदा काढण्यात आला. या गूळ ५,६७८ रुपये उच्चांकी दर मिळाला. मंगलमूर्ती ट्रेडिंग, महालक्ष्मी ट्रेडिंगने हा गुळ विकत घेतला. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून गुळाची आवक वाढली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर दरही वाढत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत व्यापारी प्रतिनिधी काडाप्पा वारद आणि पप्पू मजलेकर यांनी सांगितले की, सध्या चांगल्या प्रतीचा गूळ ५५ ते ५८ रुपये प्रतिकिलो तर मध्यम प्रतीचा गूळ ४१ ते ५० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. गुळाचा दर वाढत असल्याने गुळाची आवक वाढत आहे. बाजार समितीत गुळाचे मोठ्या प्रमाणात सौदा होत असून शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य भाव मिळत आहे.

















