सोलापूर : सांगोला येथील धाराशिव साखर कारखाना लि. वाकीशिवणे युनिट क्र. ४ यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ २८०० रुपये जमा केल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणे उसाचा पहिला हप्ता ३ हजार रुपये जमा करावा अन्यथा गव्हाणीत बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा उद्धवसेनेचे युवासेना सांगोला तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांनी दिला आहे.
सांगोला तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना केवळ २८०० रुपयेच पहिली उचल दिली जात असल्याने हा दुजाभाव का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या शेतकऱ्यांच्या गाळपास येणाऱ्या उसास ३ हजार रुपये पहिली उचल द्यावी व ही उचल दोन दिवसांच्या आत जाहीर करावी, अशी मागणी केली. यावेळी शंकर मेटकरी, नानासो गाढवे, विनायक गाढवे, सचिन सुरवसे, नानासो रोकडे, वैभव भोसले, मारुती गाढवे, नीलेश ढाले, उमेश ढाले, मनोज होनमाने, सुनील पाटील, रावसाहेब जाधव, शिवाजी होनमाने, समाधान ढाले, तानाजी टिंगरे, अक्षय भोसले, तानाजी भोसले, सागर वाघमारे, मानव पाटील, रोहन पाटील, गणेश भोसले, लहू भोसले आदी उपस्थित होते.
याबाबत धाराशिव साखर कारखाण्याची बाजू मांडताना आमदार अभिजित पाटील म्हणाले कि, सांगोला साखर कारखाना अंतर्गत धाराशिव युनिट ४ मध्ये डिस्टिलरी, इथेनॉल, वीजनिर्मिती केली जात नाही. दैनंदिन २ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून केवळ साखर तयार केली जात आहे. यासंदर्भात निवेदनकर्त्यांबरोबर सकारात्मक चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.

















