सांगली : उसाच्या शेतात सापडला बिबट्याचा बछडा, शेतकऱ्यांत घबराट

सांगली : शिराळा तालुक्यातील कापरी येथील अविनाश निकम यांच्या शेतामध्ये ऊस तोडण्याचे काम चालू असताना बिबट्याचा बछडा आढळून आला. स्थानिकांनी या घटनेची माहिती दूरध्वनी वरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदरची माहिती दिली. यावेळी अनिल वाजे व दत्तात्रय शिंदे वनरक्षक यांना दिली. सदर बिबट पिल्लू ताब्यात घेऊन त्याला एका कॅरेटमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. प्राणी मित्र सुशीलकुमार गायकवाड व धीरज गायकवाड हे घटनास्थळी उपस्थित होते.

या घटनेमुळे ऊस तोडणीत अडथळे आले आहेत. आता मादी बिबट्याची आणि बिछड्याची पुनर्भेट घडवून आणण्याकरिता अनिल वाजे वनपाल, दत्तात्रय शिंदे वनरक्षक, सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड प्राणी मित्र व संतोष कदम रेस्क्यू टीम शिराळा यांनी कॅरेटमध्ये बिबट पिल्लास ठेऊन त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. व वनविभागाची टीम प्राणी मित्र बिबट मादीवर लक्ष्य ठेऊन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here