नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी चार दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या अभ्यास दौऱ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड, पाणी व खत व्यवस्थापन, नवीन संशोधन, एआय तंत्रज्ञानाचा उपयोग यासंबंधी शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.
गेल्या २१ वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक माहिती मिळावी यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले जाते. यंदा २१ शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहे. शेती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक व्यंकटराव कल्याणकर, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कैलास दाड, ॲड. सुभाष कल्याणकर, दत्ताराव आवतारिक, शिवाजीराव पवार, बळवंतराव इंगोले, व्यंकटराव साखरे, साहेबराव राठोड, बालाजी शिंदे, कार्यकारी संचालक एस.आर. पाटील, शैक्षणिक अधिकारी आर.टी. हारकर, ऊस विकास अधिकारी रामणगिरे, दत्ताराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांमध्ये प्रशांत जाधव, आकाश कदम, श्रीपती क्षिरसागर, गणेश राऊत, नारायण नरडिले, बालाजी इंगळे, देविदास बोडके, गणेश टोनगे, गोडाजी कदम, राजाराम इंगळे, संदेश शिंदे, प्रकाश खानसोळे, दिनकर देशमुख, रविराज आवातिरक, गजानन कदम, केरबा पवार, संभाजी कपाटे, बालाजी सूर्यवंशी, संजय मूंगल, मधुकरराव कस्तुरे, नारायण कोकाटे, बालाजी तिडके, सचिन वानखेडे, राजाराम खराटे, देवबा कपाटे, आनंदराव कपाटे, गोपिचंद खांडरे, राजेश रामगिरे, प्रकाश कुराडे, गणपतराव देशमुख यांचा समावेश आहे.

















