धाराशिव : बाणगंगा साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनानंतर लगेच ऊस बिल जमा

धाराशिव : गाळप सुरू करून दोन महिने उलटले तरी बाणगंगा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिले न दिल्यामुळे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यासमोर बुधवारी (ता. ३१) दुपारी १२ वाजता आंदोलन केले. त्यानंतर लगेच संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केल्याचे मेसेज येऊ लागले. दरम्यान, आज प्रति टन २८०० रुपये जमा करण्यात आले असले तरी पहिली उचल प्रति टन तीन हजार रुपये आमच्या मागणीप्रमाणे संचालक मंडळाने दहा दिवसांत देण्याचे कबूल केले आहे. उर्वरित दहा दिवसांत रक्कम न आल्यास पुन्हा गव्हाण व काटा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा शंकर गायकवाड यांनी यावेळी दिला. यावेळी या कारखान्याचे एमडी संतोष तोंडले, शेतकी अधिकारी कुदळे, व्हाईस चेअरमनसह संचालक उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान परांडाचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याचे लक्षात येताच संचालक मंडळाने प्रती टन २८०० रुपये ऊस बिल जमा केले. मात्र शेतकऱ्यांनी प्रती टन ३००० रुपये उचल अशी मागणी असल्याचे सांगितले. यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली. आंदोलनामध्ये समाधान शिंदे, रणजीत शिंदे, परंडा तालुका अध्यक्ष अशोक कारकर, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष किरडे, विजय शिंदे, आकाश नवले, हनुमंत शिंदे, नागेश शिंदे, श्रीधर शिंदे, भूम तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खैरे, नितीन शिंदे, विजय डमरे, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, नारायण तनपुरे, बाबा सांगडे, अनिल शिंदे, विष्णू शिंदे, गणेश नवले, अश्रूबा मोरे, शहाजी अडसूळ, सत्यवान शिंदे, श्रीहरी शिंदे, सीताराम लोंढे आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here