पुणे : महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने आहेत पण ऊसदर जाहीर करण्यासाठी पुढे येत नाही; मात्र ओंकार ग्रुप नेहमीच ऊसदर जाहीर करण्यात आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल, ही खात्री निर्माण झाली आहे. ओंकार ग्रुपतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले अवघ्या १५ दिवसांत जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. ओंकार ग्रुपने घेतलेली ही भूमिका केवळ व्यावसायिक नसून, शेतकरी केंद्रित आणि सामाजिक बांधिलक जपणारी असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. त्यामुळे ओंकार ग्रुप आणि ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे – पाटील यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, जर उसाला योग्य बाजारभाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडते. त्यामुळे उसाला योग्य व जास्त बाजारभाव देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. योग्य दर मिळाल्यास शेतकरी नक्कीच ऊस उत्पादन आणि सांभाळत शेतकरी वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करतील. शेतकरी ग्रामीण भागातील शेतकरी ऊसाचे टनेज वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. बियाणे, खत, पाणी, मजुरी यावर प्रचंड खर्च होतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला असतानाही शेतकरी जीव धोक्यात घालून रात्री- अपरात्री ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात जात आहेत. त्यांना पाठबळ देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. दरम्यान, बोत्रे पाटील हे रात्रीच्या वेळी ओंकार ग्रुपच्या कारखान्यांची पाहणी करतात. ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या वाहनांना काही अडचणी येत आहेत का, याचा ते आढावा घेतात. याबाबत श्रीगोंदा येथील गौरी शुगरचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव आणि यवत येथील ओएसजी ग्रीन एनर्जी प्रा. लि कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश थोरात यांनी सांगितले की, शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून बाबुराव बोत्रे-पाटील यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ होत आहे.

















