कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याची चालू हंगामामध्ये दि. १ ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात गाळपास आलेल्या एकूण ७०४७५ मेट्रिक टन उसाची प्रतिटनास ३,४१० रुपयांप्रमाणे होणारी ऊस बिलाची २४ कोटी ३ लाख २० हजार ६३१ रुपये इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिली. संबंधित ऊस पुरवठादारांनी संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहेत. बँकेशी संपर्क साधून ऊस बिले घेऊन जावीत, तसेच दि. १ ते १५ डिसेंबर या पंधरवड्याची तोडणी-वाहतूक बिलेसुद्धा बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहेत.
माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने आजअखेर ७२ दिवसांमध्ये कारखान्याचे ३,३७,१६० मे. टन उसाचे गाळप झाले असून, ३,५४,३०० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. त्याचा सरासरी साखर उतारा १२.१३ टक्के इतका आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून १,११, ३१,००० युनिट वीज निर्यात केली आहे. यापुढेही सर्व ऊस पिकवलेला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन मंडलिक यांनी केले. यावेळी व्हा. चेअरमन आनंदा फराकटे, संचालक प्रकाश पाटील, वीरेंद्र मंडलिक, विश्वास कुराडे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, तुकाराम ढोले, मंगल तुकान, प्रतिभा पाटील, भगवान पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, इन. चीफ अकौंटंट एस. डी. पाटील आदी उपस्थित होते.
















