सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून प्रती टन १७५ रुपये ऊस बिल फरक अदा

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ व युनिट नंबर २ येथे एकूण १४ लाख ३७ हजार ४३७मे. टन गाळप झाले आहे. सुरवातीला कारखान्याने प्रतिटन २८५० रुपयांप्रमाणे पहिल्या बिलापोटी अॅडव्हॉन्स हप्ता दिला होता परंतु नंतर रीतसर ३०२५ रुपये प्रतिटन जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलेल्या ऊस बिलातील फरक प्रतिटन १७५ रुपये आता अदा करण्यात आले आहेत. साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली. हंगामात ३१ डिसेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन ३०२५ रुपयांप्रमाणे ऊसबिले अदा केले आहेत. आजअखेर पर्यंत ऊसबिलापोटी ३५७ कोटी ६९ लाख अदा केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

अध्यक्ष बबनराव शिंदे म्हणाले की, हंगामात सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे १ ते २० नोव्हेंबर अखेर गाळपास आलेल्या उसास प्रतिटन १७५ रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्यातील फरक ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. तसेच १ ते १५ डिसेंबरअखेर ऊसतोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आले आहेत. त्यापोटी २७ कोटी अदा केले आहेत. तोडणी वाहतूक बिलासाठी ८२ कोटी ६९ लाख अदा केले आहेत. तसेच या हंगामातील १ ते २० नोव्हेंबर अखेर फरक बिल प्रतिटन १७५ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. कारखान्याने ८ कोटी २० लाख अदा केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here