लातूर : रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजला येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभाग व इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलने भेट दिली. या एक दिवशीय औद्योगिक सहलीत विद्यार्थ्यांना साखरेचे उत्पादन व इतर जैव उपउत्पादन प्रक्रिया कशा पद्धतीने होतात याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. एन- साई हा रांजणी येथील नामांकित साखर कारखाना असून येथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू आहे. त्यामुळे पाठ्यक्रमात शिकविल्या जाणाऱ्या औद्योगिक व्यवस्थापन व प्रक्रिया प्रत्यक्ष जावून पाहता याव्यात व त्याद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळावे हा उद्देश समोर ठेऊन विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल आयोजित करण्यात आली होती.
प्र. प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. अवंती बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सदरील औद्योगिक भेटीत जैवतंत्रज्ञान विभागाचे बी. एस्सी. प्रथम व द्वितीय वर्षाचे ५९ विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थ्यांना नॅचरल डेअरी येथे होणारे संकलन व प्रक्रिया त्याचबरोबर दुधापासून तयार होणारे इतर खाद्यपदार्थ याविषयी माहिती देण्यात आली. एन. साईचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, जनरल मॅनेजर यू.डी. दिवेकर, लेबर ऑफिसर महादेव नाईकनवरे तसेब एच. आर. मॅनेजर सय्यद समीर यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी येडशी वन्यजीव अभयारण्याही भेट दिली. यावेळी प्रा. ऋतुजा डिग्रसकर, प्रा. स्वरूप गावकरे, प्रा. आऊ येळीकर, विशाल टर्फे व लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.

















