सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवराने बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अनेक अडचणींवर मात करीत चालू केले आहेत. राज्यभरात ओंकार शुगरच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उसाचे गाळप होणार, असा विश्वास निर्माण झाला आहे. विविध कारखान्यांमध्ये ऊस गाळपाचा शुभारंभ करताना ज्या-त्या भागाप्रमाणे उच्चांकी दराची परंपरा चालू ठेवली जाईल, अशी ग्वाही चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली होती. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात ओंकार कारखान्याच्यावतीने १५ नोव्हेंबरपर्यंतची ऊस बिले या अगोदर अदा केली होती.
ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालक रेखाताई बोत्रे-पाटील, प्रशांतराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्यांमध्ये गाळप गतीने सुरू आहे. कारखान्याच्यावतीने १५ डिसेंबरपर्यंत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर ३०५० जमा झाली आहेत. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी आप्पासाहेब नाईकनवरे म्हणाले की, कारखाना बंद असल्यानंतर ऊस गाळपाची समस्या निर्माण होते. काबाडकष्ट करून जोपासलेले उसाचे गाळप वेळेत होणे गरजेचे आहे. हे काम बोत्रे-पाटील यांनी केले. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप गतीने होत आहे.

















