जालना : जालना कारखान्याची जागा शेतकऱ्यांना परत देण्याच्या मागणीसाठी उपोषण

जालना : रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या चौकशीचे गुऱ्हाळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे साखर कारखान्याचे सभासद, शेतकरी सर्व लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शासनाने ईडीच्या ताब्यातून कारखान्याची जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मालमत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी जालना सहकारी साखर कारखान्याची जागा ईडीच्या तपासाखाली आहे.

ईडीने २०२२ मध्ये कारखान्याशी संबंधित २३५ एकर जमीन आणि इतर मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीच्या ताब्यातील जागा परत मिळावी या मागणीसाठी गांधी चमन येथे मंगळवारपासून (दि. २७) ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगरांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शेतकरी, सभासदांनी उपोषणाला सुरुवात केली. दोलनात अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, लक्ष्मणराव शिंदे, कैलास फुलारी, नारायण वाडेकर, प्रल्हाद पडूळ, अरुण वझरकर, प्रल्हाद हेकाडे, सुभाष कोळकर, सतीश देशमुख, अॅड. सोपानराव भांदरगे आदी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here