बिहार : बंद आणि नवे साखर कारखाने सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

बेगूसराय : गढपुरा विभागातील हसनपूर साखर कारखाना परिसरात झालेल्या किसान महापंचायतीमध्ये बोलताना बिहार राज्य ऊस शेतकरी आघाडीचे अध्यक्ष अशोक प्रसाद सिंह यांनी सरकारने २५ नवीन आणि ९ जुन्या साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला असल्याचे सांगितले. महापंचायतीचे अध्यक्षपद कोराई पीएसीएसचे अध्यक्ष चंदन यांनी भूषवले. अशोक प्रसाद सिंह म्हणाले कि, राज्यात किमान ८ लाख हेक्टरवरील ऊस लागवड हे एक मोठे आव्हान असून सध्या बिहारमध्ये फक्त २.३७ लाख हेक्टरवर ऊस लागवड केली जात असल्याचे सांगितले.

यावेळी विविध वक्त्यांनी बिहारमधील साखर उद्योग अडचणीत असल्याचे सांगितले. राज्यात सध्या फक्त १० साखर कारखाने कार्यरत आहेत, जे दररोज ६४,५०० टन ऊस गाळप करतात. कारखान्यांना पुरेसा ऊस मिळत नाही याकडे अनेकांनी लक्ष वेधले. साखर कारखान्यांसोबत इथेनॉल, वीज, खत, मोलॅसिस, कागद, कापूस, अल्कोहोल आणि इंधनाचे कारखाने उघडले जातील, अशी घोषणा सरकारने केली आहे. मात्र, बिहारमधील ऊस उत्पादक शेतकरी सर्वात जास्त शोषित आणि दुर्लक्षित आहेत.

राज्यात उसाचे दर सर्वात कमी आहेत. सरकारविरुद्ध ऊस उत्पादकांमध्ये मोठा रोष आहे. सरकारने ऊस उद्योगाबाबत नियमित धोरण लागू करून ऊस उत्पादकांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार करून त्या सोडवायला हव्यात, असे महापंचायतीमध्ये शेतकरी नेते राम नरेश महातो, राम विनोद महातो, राम नरेश सिंह, अरविंद राय, रामचरित्र महातो, संजीव कुमार राय, संजय कुमार चौधरी, राज किशोर सिंह, विद्यानंद राय, राम विनोद राय, संतोष ईश्वर, श्याम नंदन चौधरी आणि तारा जी आदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here