पुणे: बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती हे तिन्ही सहकारी साखर कारखाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील असल्याने एकमेकांत काही अलिखित संकेत होते. मात्र, यंदा त्याला तडा गेला आहे. माळेगाव कारखान्याने ‘सोमेश्वर’च्या कार्यक्षेत्रातील ऊस नेण्यासाठी बारा टोळ्या पाठवल्या आहेत. मोरगाव, सुपे, नाझरे, तरडोली, लोणी भापकर या पट्ट्यात माळेगावच्या बारा टोळ्या बैलगाडी, डम्पिंग, ट्रॅक्टर याद्वारे दररोज अडीचशे टन ऊस जात आहे. या कारखान्यांनी एकमेकांचा ऊस पळवायचा नाही या अलिखित करारास गालबोट लागले आहे. ‘माळेगाव’ने ‘सोमेश्वर’चा ऊस तोडून नेऊन संकेत मोडल्याने सोमेश्वरचे व्यवस्थापन नाराज झाले आहे. सोमेश्वरला १५० ते १६० दिवस चालण्यासाठी आवश्यक असलेला ऊस होता. आपला ऊस बघून पुरेसे विस्तारीकरण केले. मात्र, आता शेजारचा माळेगाव सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात घुसला आहे.
स्वतःची ऊस उत्पादन क्षमता न पाहता गाळप क्षमता वाढवत गेलेले कारखाने जिल्ह्यातच एकमेकांचा ऊस पळवत आहेत. शेजारील कारखानाच ऊस तोडून नेत असल्याने ‘सोमेश्वर’च्या उद्दिष्टावर प्रतिकूल परिणाम झाला असून, ‘सोमेश्वर’ चे व्यवस्थापन नाराज झाले आहे. दिवंगत अजित पवार यांनी पुरंदर उपसा सिंचन योजना, जानाई सिंचन योजना राबवून सोमेश्वर कारखान्याची ऊस उत्पादन क्षमता वाढविली. त्यानंतर सोमेश्वरचे विस्तारीकरण दहा हजार टनापर्यंत केले. यापूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही खासगी कारखाने थोडा थोडा ऊस पळवत होते. आता ‘माळेगाव’ अधिकच तोड करत आहे. याबाबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप म्हणाले की, सोमेश्वर व माळेगावने परवानगी किंवा करार नसताना एकमेकांचा ऊस नेऊ नये, असे समान धोरण आहे. परंतु ‘माळेगाव’च्या टोळ्या आमचा ऊस तोडत असल्याचे वास्तव असून, ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर माळेगाव कारखान्याचे शेती अधिकारी

















