सातारा : कराड तालुक्यातील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा नवीन विस्तार वाढ प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. कारखान्याने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी प्रतिदिन ११,३०० मे.टन गाळपाचा नवीन उच्चांक केला आहे, अशी माहिती माजी मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली. चेअरमन बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने प्रतिदिन ७५०० मे. टनावरून ११००० मे.टन ऊस गाळपाचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प असंख्य अडचणींवर मात करून पूर्ण करून यशस्वीरीत्या कार्यान्वित केला आहे.
चेअरमन पाटील म्हणाले, कारखान्याने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रतिदिन ११३०० मे.टन गाळप करून नवा उच्चांक प्रस्तापित केला आहे. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ११००० मे. टनाची असून, प्रतिदिन ११००० व त्याहीपेक्षा जास्त ऊस गाळप करण्याकरिता आवश्यक असलेली ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असल्याने, सह्याद्रि चालू हंगामातील ऊस तोडीचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करेल, असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.















