सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चालू गळीत हंगाम सोमवारी (दि.१६) बंद होणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी त्यांचा चालू गळीत हंगाम २०२५-२६ साठी नोंद असलेला, रस्ता अडचण अथवा इतर कारणांमुळे ज्या ऊसाची तोड होऊ शकली नाही. अशा ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या शेती गट अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तसेच संबधित ऊसाची स्वतः तोड व वाहतूक करुन, आपला ऊस वरील मुदतीपूर्वी कारखान्याकडे गाळपास पाठवावा. तोडणी वाहतुकीचा नियमाप्रमाणे खर्च देण्यात येईल. याउपरही गाळप बंद झालेनंतर कार्यक्षेत्रातील गळीत हंगाम २०२५-२६ साठी नोंदलेला सभासद अथवा बिगर सभासदांचा ऊस गाळप अभावी शिल्लक राहिल्यास त्याची कारखान्यावर जबाबदारी राहणार नाही, असे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि च्या प्रशासनाने कळविले आहे.
















