सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात झाला. यावर्षीच्या गळीत हंगामात सुमारे ९ लाख ५२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी ऊस टोळ्यांचे मुकादम यांच्याहस्ते पारंपरिक पद्धतीने काटापूजन करण्यात आले.
यावेळी शरद लाड म्हणाले, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ऊसतोड मजूर यांच्या अथक् परिश्रमामुळे हा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. सहकार, एकता आणि प्रगतीच्या बळावर क्रांती कारखाना सातत्याने नवनवीन यशशिखरे गाठत आहे. सहकार्याच्या बळावर पुढील हंगाम अधिक यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















