‘केरळ’ आता होणार ‘केरळम’, नाव बदलण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केरळचे नाव केरळम असे बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, केरळ नाव बदल विधेयक राज्य विधानसभेत मंजुरीसाठी पाठवले जाईल. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

“केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, भारताचे राष्ट्रपती भारतीय संविधानाच्या कलम ३ च्या तरतुदीनुसार आपले विचार व्यक्त करण्यासाठी केरळ (नाव बदल) विधेयक, २०२६ हे विधेयक केरळ राज्य विधानसभेकडे पाठवतील,” असे वैष्णव म्हणाले. केरळ राज्य विधानसभेचे मत प्राप्त झाल्यानंतर, केंद्र पुढील कारवाई करेल आणि ‘केरळ’ राज्याचे नाव ‘केरळम’ करण्यासाठी केरळ (नाव बदल) विधेयक, २०२६ संसदेत सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस घेतली जाईल. केरळच्या विधानसभेने जून २०२४ मध्ये “केरळ” राज्याचे नाव बदलून “केरळम” करण्याचा ठराव मंजूर केला होता. (एएनआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here