सांगली : राजारामबापू साखर कारखान्यांच्या हंगामाची साखराळे युनिटची सांगता

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये २०२५-२६ चा गळीत हंगामाची सांगता कार्तिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, जनरल मॅनेजर विजय मोरे, सुनील सावंत, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर प्रमुख उपस्थित होते.

कार्तिक पाटील म्हणाले, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनात व कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात या गळीत हंगामात १०८ दिवसांत ६ लाख ८१ हजार ६५६ टन उसाचे गाळप केले. ७लाख ५६ हजार ८४५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतलेले आहे. येथे सरासरी साखर उतारा १२.६३ टक्के मिळाला.” कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी प्रास्ताविक केले. ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील, गटाधिकारी दिलीप पाटील, संग्राम पाटील, अभिजित कुंभार, विकास कदम, प्रणिल पाटील, अजित जाधव, सुनील यादव उपस्थित होते. सचिव डी. एम. पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here