लातूर : अंबुलगा साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास मंजुरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

लातूर : अंबुलगा येथील साखर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता तेवीसशे मेट्रिक टनांनी वाढविण्यात आली आहे. यासोबतच सह- वीजनिर्मिती प्रकल्पालाही केंद्र शासनाची पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. निलंगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय जाहीर झाला आहे. कारखान्यावर १८ मेगावॉट क्षमतेचा नवीन सहवीजनिर्मिती प्रकल्प आणि १५० किलोलीटर प्रतिदिन क्षमतेचा बहुखाद्य (सी-मोलॅसिस, बी- हेवी मोलॅसिस, उसाचा रस व धान्यावर आधारित) आसवनी प्रकल्प उभारण्यास पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने १९ फेब्रुवारी रोजी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे कारखान्याची आर्थिक क्षमता वाढणार असून शेतकऱ्यांना अधिक दर देण्यास मदत होणार आहे.

मध्यंतरी बंद असलेला कारखाना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून ओंकार शुगरने पुन्हा सुरू केला. गेल्या दोन हंगामांपासून कारखाना यशस्वीरीत्या गाळप करत असून, यंदा चार लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. कारखान्याची पूर्वीची २५०० मेट्रिक कारखान्यांची वाट पाहावी लागत होती. ही क्षमता वाढवून ४८०० मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होणार आहे. वाढीव गाळप क्षमता, सहवीजनिर्मिती प्रकल्प आणि आसवनी प्रकल्प यांच्या माध्यमातून आंबुलगा कारखान्याचे रुप पालटणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here