कोल्हापूर: राजगोळी येथील ओलम अॅग्रो कंपनीच्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. चालू गळीत हंगामात कारखान्याने साडेपाच लाख मे. टन ऊस यशस्वीरीत्या गाळप केला. शेतकऱ्यांची प्रगती हेच ओमल शुगर्सचे ध्येय आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे योग्य दाम मिळवून देण्याचे कार्य ओलम करते. याच विश्वासावर हे यश गाठणे शक्य झाले आहे, असे मत कंपनीचे युनिट हेड के. रविश यांनी व्यक्त केले. पुढील गळीत हंगामासाठी आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, कंपनीमार्फत जादा उत्पादन वाढीसाठी शेतकरी मेळावे, तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे शेती अधिकारी संग्राम पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने चालू गळीत हंगामात आठ लाख टन गाळपाचे उदिष्ट ठेवले; पण हवामानातील बदलामुळे ऊस उत्पादन घटले. कारखान्याच्या काही तांत्रिक अडचणींमुळेही या वर्षी शक्य झाले नाही; पण पुढील वर्षी आठ लाख टन गाळप करणार असून, या वर्षीही ओलम ॲग्रो शुगर्स गडहिंग्लज उपविभागासह कर्नाटक सीमावर्ती भागात टॉप ठरला आहे. बिझनेस हेड टी. कन्नन यांनी ओलाम शुगर शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणेल, अशी ग्वाही दिली. एच आर. महेश भोसले, श्रीशैल एच. रमेश पाटील, नामदेव पाटील गणपत पाटील, भागोजी लांड आदी उपस्थित होते. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार अनिल पाटील यांनी मानले.


















