कोल्हापूर : शाहू कारखान्याच्या पुढाकाराने ‘एआय’ आधारित ऊस शेती, ‘एआय’ संचाचे उद्घाटन

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ऊस पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. कारखान्याच्या पुढाकाराने नानीबाई चिखली येथील राजेंद्र नुल्ले यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान संच उभारण्यात आला. या संचचे उद्घाटन शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेत शाहू कारखाना शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान पुरवत आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी केले. एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शाहू कारखाना ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन बसवण्यासाठी प्रोत्साहनपर महत्त्वाकांक्षी योजना समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केली. शेतकऱ्यांना साठ हजार रुपयांपैकी पन्नास हजार रुपये राजे बँकेमार्फत सवलतीच्या व्याजदरात विना जामीनदार देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. शाहू कृषीचे संचालक राजेंद्र नुल्ले यांनी मनोगत व्यक्त केले. व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, राजे बँकेचे व्हा. चेअरमन रवींद्र घोरपडे, संचालक संजय चौगुले, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक अरुण पाटील, शाहू कृषीचे संचालक जगदीश मोरे, कार्यकारी संचालक सदानंद घोरपडे, पं. स. सदस्य सुवर्णा जाधव, सर्जेराव तुकान, तुकाराम संकपाळ, आण्णासाहेब गळतगे आदी उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले. ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाळकृष्ण काईंगडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here