बीड: बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हिताचा कारखाना म्हणून आता गंगा माऊली शुगर या कारखान्याने अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. केवळ साखरेचे उत्पादन घेउन इतर कारखान्याच्या बरोबरीने हा कारखाना उसाला दर देत आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात ५ लाख ५० हजार ८८ गाळप करून ११ टक्के असा उत्कृष्ट साखर गाळप उतारा मिळवला आहे. कारखान्याने वैशिष्ट्य म्हणजे अगदी पहिल्या गळीत हंगामापासून जपले आहे, ते म्हणजे दर १५ दिवसाला शेतकऱ्यांना उसाचे बील दिले जाते.
कारखान्याने सध्या २८ फेब्रुवारी पर्यंतचे बील देऊन कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.बीड जिल्ह्याचे सुपुत्र लक्ष्मण मोरे यांनी तीन वर्षांपूर्वी गंगा माऊली शुगर सुरू केला. गंगा माऊली शुगर हा कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. कारखान्याकडून इतर कोणतेही उपउत्पादन घेतले जात नाही. केवळ साखर उत्पादनावर हा भाव देणे तसे सोपे नाही, मात्र मोरे यांनी यात सातत्य ठेवले आहे. यासाठी त्यांना आदित्य पाटील, राहुल सोनवणे, हनुमंत काका मोरे, प्रविण मोरे, अविनाश मोरे यांची मदतही मिळत आहे.

















