अहिल्यानगर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात कामगारांना मार्गदर्शन

अहिल्यानगर: संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कारखाना अंतर्गत उत्पादन, रासायनिक उपपदार्थ निर्मिती, सहवीज, बायोगॅस, इथेनॉल, अग्निशमन आदी विभागांसाठी दर्जेदार सुरक्षा उपकरणे घेऊन प्रशिक्षित मनुष्यबळाच्या माध्यमांतून संभाव्य अपघात टाळले आहेत, असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी केले. कारखान्यात ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक निवृत्ती बनकर होते. यावेळी सुरक्षा उपकरणासह काळजीवाहक संदेश फलकाचे प्रदर्शन कार्यस्थळी मांडण्यात आले होते. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी सुरक्षा ध्वज फडकवत उपस्थित कामगारांना सुरक्षेची शपथ दिली. संचालक बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, एचआर मॅनेजर विशाल वाजपेयी उपस्थित होते. सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी सूत्रसंचालन केले. संदीप गवळी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here