अहिल्यानगर जिल्ह्यात २१ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला, एकच कारखाना सुरू

अहिल्यानगर : नगर जिल्हा साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी येथे साखरेचे विक्रमी उत्पादन होते. यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील २२ कारखाने सुरू होते. त्यात १४ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. मार्च महिनाअखेर हंगाम चालेल, असा अंदाज होता. मात्र, गंगामाई वगळता सर्व २१ कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी १५ लाख ४३ हजार ९६५ मेट्रिक टनाचे गळीत झाले. त्यातून १ कोटी २ लाख ९९ हजार ८३५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. जिल्ह्याने ८.९२ टक्के सरासरी उतारा राखला आहे.

यंदाच्या हंगामात २२ कारखान्यांनी गळीत हंगाम केला. त्यातील नऊ कारखान्यांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त साखर उतारा राखण्यात यश मिळाले. अकोल्याच्या अगस्ती साखर कारखान्याने सर्वाधिक ११.२७ टक्क्यांचा उतारा घेतला आहे. त्याखालोखाल कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक उतारा घेतला. हळगावच्या (जामखेड) बारामती अॅग्रोनेही अकरावर उतारा घेतला आहे. क्रांती शुगर, वृद्धेश्वर, श्रीगोंदे, प्रसाद या कारखान्यांनीही दहा टप्पा ओलांडला. जिल्ह्याने सव्वा कोटी साखरेचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात गाळपात इंडिकॉनने आघाडी घेतली आहे. १४ लाख १० हजार ६१ मेट्रिक टन उसाचे गळीत केले आहे. त्यातून १० लाख ८१ हजार ५०० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. भेंडा येथील घुले कारखान्यानेही १० लाख टनांचे गाळप केले आहे. त्यांना ९ लाख ३१ हजार साखर पोती उत्पादन मिळाले आहे. विखे, थोरात, गौरी शुगर, काळे आदी कारखान्यांचेही चांगले गळीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here