सोलापूर : पांडुरंग कारखान्याच्यावतीने ऊस पिकात एआय तंत्रज्ञान वापराबाबत शेतकऱ्यांन मार्गदर्शन

सोलापूर : श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पु्ण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ डॉ. समाधान सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडोळ आदी तज्ज्ञ उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस पिकासाठी आवश्यक तेवढेच पाणी व रासायनिक खतांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार आहे, असे मत डॉ. सुरवसे यांनी व्यक्त केले.

यावेळी यावेळी तज्ज्ञ तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडवळ, अविनाश पांगारकर, नितीन शिंदे यांनीही शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीमध्ये अचूकपणे कसा करता येईल, याबाबतची सखोल माहिती दिली. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत आहे अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. शेती अधिकारी संतोष कुमठेकर, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, मुख्य लेखापाल रवींद्र काकडे, चीफ इंजिनिअर सचिन विभुते, महेश देशपांडे, समीर सय्यद, एस. ए. ताम्हाणे आदी उपस्थित होते. डॉ. सुधीर पोफळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here