लोकशक्ती कारखान्याचे १.५१ लाख मे. टन गाळप : चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती

सोलापूर : औराद येथील लोकशक्ती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. साखर २०२५-२६ चा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला सोलापूर, आहे. या हंगामात गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण बिल कारखान्याने शेतकऱ्यांना दिले. १० वर्षांपासून बंद कारखाना अथर्व ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाला. कारखान्याने १ लाख ५१ हजार टन गाळप पूर्ण केल्याची माहिती चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.चेअरमन खोराटे व व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत कारखाना सुरू झाल्याने हजारोन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आम्ही दिलेला शब्द पाळला असून शेतकऱ्यांच्या घामाचा दाम वेळेत दिला आहे. यापुढेही लोकशक्ती कारखाना अशाच पद्धतीने काम करेल, असा विश्वास कारखान्याच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला. आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदणी करावी, असे आवाहन देखील चेअरमन खोराटे यांनी केले आहे. कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, कार्यालयीन अधीक्षक विवेक पवार, मुख्य शेती अधिकारी राजाराम पवार, अभियंता सिद्धेश्वर शिंदे, अमोल कुलकर्णी, अखिल बिटे, संजय करजगी, शिवाजी शिंदे, बसवराज निंगफोडे, बाळासाहेब गायकवाड, अमोल तिथें, प्रहेश खटके, सचिन मळगे, चंद्रकांत राठोड आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here