अहिल्यानगर : कोल्हे कारखान्याची स्वदेशी तंत्रज्ञानाने भरारी, ‘इथेनॉल स्टोव्ह’चे संशोधन सादर

अहिल्यानगर : सध्या देशभरत एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर संजीवनी उद्योग समूह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना व पुणे स्थित कंपनीने आत्मनिर्भर भारत अंतर्गत उत्पादित केलेला इथेनॉलवर चालणारा स्टोव्ह व्यावसायिक ग्राहकांना वरदान ठरू शकतो. शासनाने इथेनॉल स्टोव्हला परवानगी द्यावी, सुरक्षिततेसह त्याचे फायदे आहेत. केनियासारख्या देशात १५ लाख घरांमध्ये हा इथेनॉल स्टोव्ह वापरला जातो. शासनाने परवानगी दिली, तर आम्ही प्रायोगिक तत्त्वावर स्टोव्ह तत्काळ उपलब्ध करून देऊ शकतो. यातून शेतकऱ्यांना अन्नदाता ते ऊर्जादाता करण्यात व सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळण्यास मदत होऊ शकेल, असे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले.

सध्या गॅस टंचाईच्या झळा व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे इंधन तुटवड्यावर कारखान्याने सादर केलेला हा तोडगा फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने अनेक पायलट प्रोजेक्ट राबवत सहकाराला दिशा दिली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे कौतुकही केले आहे. आता विकसित केलेला इथेनॉल स्टोव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला प्रतिसाद देणारा आहे. त्याच धर्तीवर एलपीजी गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर होऊ शकतो, असे कोल्हे यांनी सांगितले. देशाततील कारखान्यांकडे १००० कोटी लीटर इथेनॉल शिल्लक राहते. या अतिरिक्त इथेनॉलचे काय करावे हा प्रश्न आहे. त्यामुळे कमर्शिअल फ्युएल म्हणून ५०० ते ६०० कोटी लीटर इथेनॉलचा वापर होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here