चंदीगड : हवामान खात्याने येत्या 48 ते 72 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी रात्री हाय अलर्ट दिला आहे. सर्व उपायुक्तांना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.
भाकरा बियास व्यवस्थापन मंडळाने भाकरा धरणाचे पूर दरवाजे उघडल्यामुळे राज्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. अमरिंदरसिंग यांनी उपायुक्तांना येणार्या कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे आदेश दिले.
आवश्यकतेनुसार मदत आणि पुनर्वसन कामांसाठी कृती आराखडा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मुसळधार पावसाचा अंदाज पाहता अधिकार्यांना त्यांचे मुख्यालय सोडू नका असे सांगण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
















