‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझीनेस इकॉनॉमिस्ट‘ या संस्थेच्या अहवालानुसार अमेरीकेत पुढील 2020-21 या दोन वर्षात मंदी सदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
संस्थेने पाहणी करुन तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, फेडरल रिझर्व्ह बँकेने 2018 मध्ये व्याजदरात वाढ केली होती, ती कमी करुन याबाबत ठोस संदेश दिला आहे. सध्या बँकेने राबवलेल्या काही उपाययोजनांमुळे मंदी रोखली गेली आहे.
एनएबीई चे अध्यक्ष कॉन्सटन्स हंटर म्हणाले, 38 टक्के अर्थतज्ञांच्या मतानुसार मंदी 2021 मध्ये सुरु होईल असे वाटते, तर 46 टक्के अर्थतज्ञांना फेडरल रिझर्व्हकडून आणखी एक दरकपात अपेक्षित आहे. चीन आणि अमेरिकेत काही तडजोडी होवून यातून काही मार्ग निघेल, अशी आशा 64 टक्के अर्थतज्ञांनी व्यक्त केली.
ट्रम्प म्हणाले, देशात मंदीची चिन्हे मला दिसत नाहीत. मी कर खूप कमी केले आहेत. शिवाय वॉलमार्टची दुकाने ग्राहकांनी ओसंडत आहेत. बाकी देशांची अर्थिक कामगिरी आमच्यासारखी चांगली नाही. वर्षाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था सुधारेल, असे ट्रम्प यांचे अर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.












