सांगली : हुतात्मा साखर कारखान्यावर कारखान्यावर झालेले कर्ज अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी फेडले पाहिजे. केवळ वैभव नायकवडी यांनी केवळ राजीनामा देऊन चालणार नाही. अन्यथा सभासद व शेतकरी माघार घेणार नाहीत, असा इशारा केदार नायकवडी यांनी दिला. गौरव नायकवडी यांनी हुतात्मा कारखान्यातील कथित साखर चोरीप्रकरणी कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या सभासद व शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात बुधवारी संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी किरण नायकवडी म्हणाले, वेळ जसजसा जाईल तसतसे आंदोलक ढेपाळतील असा काहींचा गैरसमज होता. मात्र आज पावसातही एकही आंदोलक हलला नाही. आंदोलन मागे घेणार नाही. ते म्हणाले की, कारखान्यावरील कर्जाबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्याने चर्चा अपुरी राहिली आहे. गेल्या २० वर्षांत झालेल्या व्यवहारांचा तपशील आता समोर येत आहे. हुतात्मा कारखान्याचे कामकाज गतीने सुरू असून वेळेत गाळप हंगाम सुरू केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


















